‘परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून…,’ काय म्हणाले शरद पवार ?
परभणी संविधान प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सुर्यवंशी तरुणाचा पोलिस मारहाणीत मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील पीडीत कुटुंबाची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
परभणीत संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेत झालेल्या आंदोलनानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी असे 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. वकीलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा अशा प्रकारे पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोमनाथ सुर्यवंशी याचा नाहक बळी गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी या पीडीत कुटुंबांची भेट घेतली आणि खरी परिस्थिती जाणून घेतली आहे. या प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केली आहे. ती आपण शासनाकडे लावून धरणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. संविधान विटंबनानंतरची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात संबंधित यंत्रणा अपयशी झाल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

