Patra Chawl Scam: संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न- सुनील राऊत
देशात विजय माल्या आणि निरव मोदी सारखे लोकं मोठं मोठे घोटाळे करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच त्यांना ईडीची नोटीस येते ते भाजपात गेल्यानंतर स्वछ होतात असा टोलाही त्यांनी लगावला.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) इडीच्या ताब्यात असलेले संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीसुद्धा आज चौकशी होणार आहे. वर्षा राऊत या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. या प्रकरणी संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत हे भाजपच्या विरोधात बोलतात त्यामुळे त्यांना मुद्दाम या प्रकरणात अडकवले जात असल्याचे सुनील राऊत म्हणाले. इडी दबावाखाली काम करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांनी केला आहे. देशात विजय माल्या आणि निरव मोदी सारखे लोकं मोठं मोठे घोटाळे करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच त्यांना ईडीची नोटीस येते ते भाजपात गेल्यानंतर स्वछ होतात असा टोलाही त्यांनी लगावला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
