‘सबसे कातील, गौतमी पाटील’; पोलिसांनी ‘या’ कारणामुळे नाकारली कार्यक्रमाला परवानगी!
नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासंबंधित मोठी बातमी समोर आली आहे.येत्या 1 सप्टेंबरला शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात कार्यकर्त्यांकडून गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बुलढाणा, 17 जुलै 2023 | आपल्या नृत्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असलेली गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासंबंधित मोठी बातमी समोर आली आहे. गौतमी आणि राडा असं नवं समीकरणच राज्यात तयार झालं आहे. दरम्यान हे समीकरण लक्षात घेत बुलढाणा येथे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. येत्या 1 सप्टेंबरला शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात कार्यकर्त्यांकडून गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना कायदेशीर परवानगी मागितली होती. परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
