Fule Shortage And Price Hike | महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर नागरिकांचा संताप, दुसऱ्यांदा दर वाढ, आता पेट्रोलचे दर काय?
देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला असून सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. अवघ्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. देशभरात पेट्रोलचे दर 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले.
देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला असून सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. अवघ्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरवाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. देशभरात पेट्रोलचे दर 86 पैशांनी तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले. अवघ्या पाच दिवसांपूर्वी दोन्ही इंधनांचे दर प्रत्येकी 3 रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर आज पुन्हा पेट्रोल-इंधन महागल्याचं दिसून आलं आहे. तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा होत असल्याने दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे सांगत किंमती वाढवण्यात आल्या आहेत. आज पुन्हा दोन्ही इंधन जवळपास 90 पैशांनी महागली आहेत.
नवीन दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागले आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 107 रुपये 86 पैशांवर पोहोचला आहे. नागपूरमध्ये पेट्रोलसाठी 108 रुपये 7 पैसे मोजावे लागत आहेत, तर मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 107 रुपये 59 पैसे इतका झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा दर 109 रुपये 47 पैसे असून रत्नागिरीमध्ये तो 109 रुपये 53 पैशांवर पोहोचला आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आगामी काळात इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पेट्रोल पंपांवर नागरिकांनी या दरवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचा हा धंदा झाला आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
Published on: May 19, 2026 10:47 AM
पुण्यात 120 कर्मचाऱ्यांच्या कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा!
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा

