Pune Crime : पिंपरीत आणखी एक वैष्णवी हगवणे जीवाला मुकली, सहनशीलतेचा अंत, दीड वर्षाच्या चिमुकल्याचा विचार न करता…
पिंपरी चिंचवड येथील या प्रकरणात किरणचे वडील संजय दोड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये आशिष दामोदर, त्याची आई सुनंदा दामोदर, वडील दीपक दामोदर यांच्या विरोधात हुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणासारखी दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे. पाच लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच मोटरसायकलच्या मागणीसाठी किरण दामोदर या 26 वर्षाच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 26 वर्षाच्या विवाहित महिलेला दीड वर्षाचा अधिर हा चिमुकला बाळं देखील आहे. दारुड्या पतीच्या हुंड्याच्या जाचाला कंटाळून किरण हिने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीमागे सोडत 17 जुलैच्या मध्यरात्री बोऱ्हाडे वाडी येथील ए डी बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरात आपलं जीवन संपवल आहे. किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. किरणचा पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिवीगाळ करून तिला मारहाण करत होता, तसेच तिला त्याच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आण असा तगादा लावत असल्याने, शेवटी सहनशीलता संपलेल्या किरणने टोकाचं पाऊल उचललं आहे.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा

