Mumbai Local : CSMT स्थानकात क्लिनिंग मशीन ट्रॅकवर पडली अन् मोटारमॅनने जागीच थांबवली ट्रेन.. पुढे काय झालं बघा
रेल्वे ट्रॅकवर मशीन पडल्याची घटना घडली त्यावेळी एक लोकलही त्याच प्लॅटफॉर्मवरून समोरुन येत होती. मोटरमननं वेळीच लोकल रोखल्यामुळे अपघात टळला आहे.
मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी रेल्वे स्थानकावर समोरून ट्रेन येत असताना प्लॅटफॉर्म स्वच्छ करणारं मशीन ट्रॅकवर पडल्याची घटना घडली. मात्र मोटरमॅनने जागीच लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन अचानक रेल्वे रुळावर पडली. या मशीनमध्ये इलेक्ट्रिक बॅटरीचा समावेश असतो. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही. ही मशीन ट्रॅकवर पडल्याचे लक्षात येताच तातडीने रेल्वे पोलीस दाखल झाले आणि रेल्वे सफाई आणि इतर कर्मचाऱ्याच्या मदतीने ही मशीन हटवण्यात आली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

