Maratha Reservation : मराठा आरक्षणावर मोदी सरकार तोडगा काढणार? आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार?
मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने आता तोडगा काढावा आणि त्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यागा हटवावी, अशी स्पष्ट भूमिका विरोधकांनी मांडली आहे. तर सरकारनं म्हटलंय की कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आणि विरोधक म्हणताय मराठ्यांना आरक्षण द्या पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लावू नका.
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं असून त्यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने लक्ष घालून ५० टक्क्यांची मर्यादा उठवावी, असं विरोधकांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणावर केंद्र सरकारने आता तोडगा काढावा आणि त्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यागा हटवावी, अशी स्पष्ट भूमिका विरोधकांनी मांडली आहे. तर सरकारनं म्हटलंय की कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार आणि विरोधक म्हणताय मराठ्यांना आरक्षण द्या पण इतरांच्या आरक्षणाला धक्का लावू नका. शिंदे यांची शिवसेना म्हणतेय ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देणार, भाजप म्हणतेय मराठ्यांना आरक्षण देणार पण ओबीसी कोट्यातून नाही. अजित पवार गट म्हणतंय मराठ्यांना आरक्षण द्या मात्र इतरांच्या कोट्यातून नाही. ठाकरे यांची शिवसेना म्हणतेय इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या आणि काँग्रेसचं म्हणणं आहे, ५० टक्क्यांची मर्यादा हटवून आरक्षण द्या…आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांच्या अशा आहेत भूमिका.