Punjab ला फुटीरतावादापासून वाचवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करतील – PM Narendra Modi – Delhi -Tv9

| Updated on: Mar 10, 2022 | 10:15 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाब जिंकलं आहे. त्यामुळे देशभरातून केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे.

Punjab ला फुटीरतावादापासून वाचवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करतील - PM Narendra Modi - Delhi -Tv9
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाब जिंकलं आहे. त्यामुळे देशभरातून केजरीवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं आहे. पंजाब  हे सीमावर्ती राज्य आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावून पंजाबला फुटीतरतावादी राजकारणापासून सतर्क ठेवण्याचं काम करतील. येणाऱ्या पाच वर्षात भाजपचं कार्यकर्ते ही जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पूर्ण पाडतील अशी ग्वाही देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात पंजाबमधील आम आदमी पार्टीचं सरकार भाजपच्या रडारवर असणार असल्याचे संकेत मिळत आहेत. चार राज्यातील विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट संकेत दिले.