‘मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं पण…’, पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता टीकास्त्र
VIDEO | देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांकडून विविध पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मोठं विधान
मुंबई : मला जेलमध्ये टाकण्यासाठी जाळं टाकलं होतं, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. “भ्रष्टाचाराने देशाचं खूप नुकसान केलं आहे. भ्रष्टाचाराने देशाला खूप सतावलं आहे. देशाची जनता पाहत आहे की, आधीच्या सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाईच्या नावाने फक्त खानापुरी केली. हे तर ते लोकं ज्यांनी मलाही जेलमध्ये टाकण्यासाठी कोणतं जाळं नाही टाकलं. पण ते त्यामध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरले”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंतर नाव न घेता काँग्रेसवर याबाबतची टीका केली आहे. तसेच काँग्रेस सत्तेत असताना काही लोक बँकेला लुटून पळाले, असंदेखील मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशभरात विविध पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं मोठं विधान केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता

