Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज देशातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक : सूत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांची बैठक घेणार आहेत. ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढत्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांची बैठक घेणार आहेत. ही बैठक ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येनं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी या बैठकीत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना देऊ शकतात. या बैठकीत कोरोनाबाधितांची जादा रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमधील स्थितीवर चर्चा होऊ शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI