भाजप सुसाट, आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी? मोदी म्हणाले…
विजयानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी गॅरंटी असं कॅपेन सुरू, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर आता मोदी यांनी साडेचार महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीचा शंख नादही केलाय
मुंबई, ५ डिसेंबर २०२३ : तीन राज्यातील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. २०२४ ची गॅरंटी मिळाल्याचे मोदी म्हणालेत. या गॅरंटीसमोर विरोधकांची इंडिया आघाडी नेमकी कुठं आहे? या विजयानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी गॅरंटी असं कॅपेन सुरू झालंय. तर गॅरंटीचं दुसरं नाव मोदी, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर आता मोदी यांनी साडेचार महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकीचा शंख नादही केला आहे. २०२४ मध्ये मोदी विरुद्ध देशभरातील विरोधकांची इंडिया आघाडी असा थेट सामना होणार आहे. NDA चं नेतृत्व मोदीच करत आहे. तर इंडिया आघाडीची कमान काँग्रेसच्या हाती आहे. मात्र इंडिया आघाडीवर पंतप्रधान मोदी यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडीचा फोटो चांगला निघू शकतो मात्र जनतेचा विश्वास जिंकता येऊ शकत नाही, असा हल्लाच त्यांनी चढवलाय