इंडिया आघाडी टिकणार की नाही? शिवसेनेच्या नेत्यानं स्प्ष्ट म्हटलं…
काँग्रेसची सत्ता ही अनेक वर्षापासून होती. त्या तुलनेत आजचा विकास भाजप सरकार काळात झाला आहे. लोकांना आता इमोशनल करून मतं मिळत नाही तर विकास करून मिळतात असेही संजय शिरसाट यांनी खोचक भाष्य केले आहे. तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी टिकणार की नाही? यावर म्हणाले...
मुंबई, ३ डिसेंबर २०२३ : देशातील पाच राज्यातील निवडणूक म्हणजे सेमी फायनल होती. विधानसभा निवडणुकीचा येणार कौल हा येणाऱ्या लोकसभेची नांदी आहे. इतकंच नाहीतर महाराष्ट्रात देखील या निकालाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी टिकणार नाही, असा दावाच शिवसेना नेते, आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तर येणारी सत्ता ही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची असणार आहे, असा विश्वासही संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेसची सत्ता ही अनेक वर्षापासून होती. त्या तुलनेत आजचा विकास भाजप सरकार काळात झाला आहे. लोकांना आता इमोशनल करून मतं मिळत नाही तर विकास करून मिळतात असेही त्यांनी खोचक भाष्य केले आहे. तर बीआरएसने ओव्हर काॅन्फिडन्समध्ये राज्य गमावलं, बीआरएसने महाराष्ट्रात अमाप पैसा खर्च केला. देशपातळीवर पक्ष नेताना आपल्या राज्यात त्यांनी दुर्लक्ष केलं, त्याचा फटका त्यांना बसल्याचेही शिरसाट यांनी म्हटले आहे.