AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले मी बोलण्याचा प्रयत्न करतो पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले “मी बोलण्याचा प्रयत्न करतो पण…”

| Updated on: Feb 21, 2025 | 6:53 PM
Share

देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सरस्वतांना माझा नमस्कार, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात केली. मी जेव्हा मराठीचा विचार करतो तेव्हा मला ज्ञानेश्वरांचा अभंग आठवतो. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतासेही पैजासे जिंके, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

नवी दिल्लीत आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं. या संमेलनासाठी देश आणि विदेशातील साहित्य रसिक उपस्थित होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी मराठी भाषणाची सुरुवात केली. देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सरस्वतांना माझा नमस्कार, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात केली. मी जेव्हा मराठीचा विचार करतो तेव्हा मला ज्ञानेश्वरांचा अभंग आठवतो. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतासेही पैजासे जिंके. मराठी भाषा अमृताहून गोड आहे. त्यामुळे मराठीबाबत माझं प्रेम आहे. ते तुम्हाला माहीतच आहे. मी मराठीत एवढा प्रविण नाही. पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Published on: Feb 21, 2025 06:53 PM