एसटीच्या हायटेक ‘शिवशाही’ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा अन्… VIDEO बघून तुम्हीही म्हणाल…
पुण्यातील शिवशाही बसचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पुण्यातील शिवशाही बस गाड्यांची मोठी दुरावस्था झाली असून शिवशाही बसचा दरवाजा दोरीने बांधण्याची वेळ आली आहे. यावरून एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर येत आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर एका २६ वर्षीय तरूणीवर आरोपी दत्तात्रय गाडे या नराधमाने शिवशाही बसमध्येच अत्याचार केला. मात्र हा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. काल सकाळी ५.३० वाजता घडलेल्या या घटनाचा गुन्हा संध्याकाळी दाखल करण्यात आला. दरम्यान, तोपर्यंत आरोपी त्याच्या गावात मोकाट फिरत होता. मात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर नराधमाने आपल्या गावातून पळ काढला. या धक्कादायक घटनेनंतर पुणे चांगलंच चर्चेत आहे. अशातच पुण्यातील शिवशाही बसचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पुण्यातील शिवशाही बस गाड्यांची मोठी दुरावस्था झाली असून शिवशाही बसचा दरवाजा दोरीने बांधण्याची वेळ आली आहे. यावरून एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचे समोर येत आहे. आरामदायी प्रवास व्हावा म्हणून एसटीचे प्रवाशी शिवशाही बसने प्रवास करणं पसंत करतात मात्र सध्या एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था पाहून तुम्हीही आवाक् व्हाल. दरम्यान एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अशी दयनीय अवस्था बघायला मिळत असेल तर मग लालपरीची काय आवस्था असेल? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

