Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार…; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले…
प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारला हिटलरशाहीचे सरकार संबोधत गंभीर टीका केली आहे. देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचा इशारा त्यांनी दिला. ज्ञानेश कुमार यांच्या कारवाईचा संदर्भ देत, सरकारने आपली चूक मान्य केली नाही तर लोकशाही धोक्यात येईल आणि शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार हिरावला जाईल असे आंबेडकर म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दात हल्ला चढवला आहे. देशात सध्या हिटलरशाहीचे सरकार सत्तेवर असून, या सरकारच्या वृत्तीमुळे देशात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
आंबेडकर म्हणाले की, “हे जे सरकार आहे, हे हिटलरशाहीचं सरकार आहे. या सरकारमध्ये आम्ही चुकतो किंवा आम्ही कोणाशी चर्चा केली पाहिजे अशी वृत्ती नाहीये.” ज्ञानेश कुमार यांच्या काही कारवाईचा संदर्भ देत, सरकारने आपली चूक मान्य करण्याची तयारी ठेवली तरच लोकशाही टिकेल, असे मत आंबेडकरांनी व्यक्त केले. अन्यथा, जर हुकूमशाहीचा हाच वृत्त राहिला, तर देशात सिव्हिल वॉर (गृहयुद्ध) होताना दिसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
शांततापूर्ण आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मात्र, शासन हाच अधिकार मारायला निघाले असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. शासनालाच सिव्हिल वॉर पाहिजे अशी सध्याची परिस्थिती असल्याचं त्यांना दिसतंय. त्यामुळे, त्यांनी सरकारला आवाहन केले की, “हे आंदोलन शांततेने पार पडू द्या, लोकांचं म्हणणं ऐकायची तयारी ठेवा.”
Published on: Oct 10, 2026 11:49 AM
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

