वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम नाही : प्रकाश आंबेडकर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
राज्यात लोकसभा निवडणुकांच्या वेळी वंचित बहूजन आघाडीनं मोठं आव्हान उभं केलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत देखील वंचित बहूजन आघाडी मैदानात उतरली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. वंचित बहूजन आघाडी भाजपची बी टीम नाही. उत्तर प्रदेशसह भाजप चार राज्यात निवडून आले आहे. तिथे काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे मग काँग्रेस भाजपची बी टीम नाही का? , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

