AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prakash Mahajan : डोक्याला कफन बांधलं, दंड थोपटले; महाजन विरुद्ध राणे वाद शिगेला

Prakash Mahajan : डोक्याला कफन बांधलं, दंड थोपटले; महाजन विरुद्ध राणे वाद शिगेला

| Updated on: Jun 10, 2025 | 12:13 PM
Share

prakash mahajan vr narayan rane : प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांचा वाद आता शिगेला जाऊन पोहोचला आहे. आज प्रकाश महाजन यांनी देखील राणेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

नितेश राणेंनी राज ठाकरेंवर केलेल्या टिकेनंतर सुरू झालेल्या वादात आता चांगलीच ठिणगी पडली आहे. मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यातलं शाब्दिक युद्ध आता धमक्यांवर येऊन पोहोचलं आहे. काल राणे यांनी ‘पुन्हा आमच्याविरोधात बोललात, तर उलट्या करायला लावीन’ अशी धमकी महाजन यांना दिल्यानंतर आता 75 वर्षांच्या प्रकाश महाजन यांनी नारायण राणेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

यावेळी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलताना महाजन म्हणाले की,  मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. नारायण राणे मी कणकवलीत येतो, करायला लावा उलट्या. मला लेचपेचा समजू नका. जीवाला भिलो असतो, तर एक शिक्षकाचा मुलगा राजकारणात आला नसता. संघ, भाजप आणि फडणवीस यांच्याबद्दल काय बोलतात हे बापलेक काढून पहा. “गिड्ड त नू फितनतू” गिड्ड्या माणसाचा जन्मजात स्वभाव कळत नाही ही म्हण आहे मराठवाड्यात. आज मी क्रांती चौकात उभा राहणार आहे. ज्यांना माझे घर माहित नाही, त्यांनी क्रांती चौकात यावे आणि काय करायचे ते करावे, असं देखील प्रकाश महाजन म्हणाले.

Published on: Jun 10, 2025 11:45 AM