Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना भावनिक पत्र, म्हणाले..
Pratap Sarnaik Write Letter to Eknath Shinde : प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन पानी भावनिक पत्र लिहिले आहे.
शिवसेना शिंदे गट नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, मराठीच्या नावाखाली एकत्र येत आहेत, मग यापूर्वी वेगळे होणे कोणाच्या हितासाठी होते? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्यांचा जीव महापालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या राजकारणाला खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी ठरवत, त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाची फसवणूक केल्याचा आरोप केला.
काल झालेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसले. यानंतर प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन पानी भावनिक पत्र लिहिले. पत्रात त्यांनी म्हटले की, मराठीचे स्वयंघोषित कैवारी असल्याचा आव आणणाऱ्यांनीच मराठीचे सर्वाधिक नुकसान केले. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा बागुलबुवा उभा केला जात आहे. ठाकरेंचा प्रकार हा ‘गब्बर के ताप से गब्बरही बचा सकता है’ असा आहे. लोकांना खोटी भीती दाखवून स्वतः ‘गब्बर’ बनून ‘गबर’ होण्याचे धोरण आहे, असे सरनाईक म्हणाले. पुढे त्यांनी सवाल उपस्थित केले, उबाठाच्या काळात महापालिकेच्या शाळा इंग्रजी झाल्या. मराठी पाट्यांचा आग्रह धरणाऱ्यांच्या लग्नपत्रिका इंग्रजीत का छापल्या? गिरणी कामगार देशोधडीला लागले, मराठी माणूस विरार, नालासोपारा, बदलापूरला का ढकलला गेला? याला जबाबदार कोण? असे प्रश्न सरनाईक यांनी पत्रातून उपस्थित केले आहेत.

खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार

दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी

घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका

तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन;'राज' गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना इशारा
