Pravin Pote Amravati | अमरावती शहर काश्मीर नाही, माजी मंत्री प्रवीण पोटेंचा सरकारवर हल्लाबोल
माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी सीटी पोलिसांसमोर स्वत:हून अटक करुन घेतली आहे. दरम्यान, पोटे यांनी आज माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केलाय. आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, रझा अकादमीचे लोक त्यात शिरले आणि सगळा हिंसाचार घडला, असं पोटे म्हणाले.
मी स्वत:हून अटक करुन घेतली. आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, त्यात रझा अकादमीचे लोक शिरले आणि सगळा हिंसाचार घडला. हिंदूंवर हल्ला करण्याचा प्रय़त्न केला गेला. त्याला उत्तर देण्यासाठी बंद पुकारला होता, मात्र हिंसाचार घडला. अमरावती शहरात संचारबंदी लावण्यात महाविकास आघाडी सरकारचा हात आहे. हिंदू-मुस्लिम या ठिकाणी काम करतात. संचारबंदीमउळे त्यांचं नुकसान होत आहे. संचारबंदी हटवावी यासाठी जामीन मिळाल्यानंतर पोलिस आयुक्तांशी बोलणार असल्याचंही पोटे यांनी सांगितलं. संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान होत असल्याचं पोटे म्हणाले. आज माजी राज्यमंत्री आणि भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी सीटी पोलिसांसमोर स्वत:हून अटक करुन घेतली आहे. दरम्यान, पोटे यांनी आज माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केलाय. आम्ही शांततेत बंद पुकारला होता. मात्र, रझा अकादमीचे लोक त्यात शिरले आणि सगळा हिंसाचार घडला, असं पोटे म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

