‘येणारा काळच या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल’, Pravin Darekar यांचा महाविकास आघाडीला टोला

मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेने भाजपविषयीची आपले मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत.

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला जबर धक्का बसला. भाजपचे उमेदवार सुभाष साबने यांचा तब्बल 41 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर हे विजयी ठरले. मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली ? जनतेची भाजपविषयीची आपली मते बदलली आहेत का ? असे प्रश्न विचारले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला असावा, याची नेमकी कारणं सांगतली आहेत. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतं केली असं दरेकर यांनी म्हटलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI