Video : कायदा सुव्यवस्था राखणं राज्य सरकारची जबाबदारी- प्रवीण दरेकर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या 03 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे (Loud Sperakers) हटवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल, अशा इशाराही दिला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीदेखील राज ठाकरेंच्या या भूमिकेला पाठींबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांसाठी समान लागू झाला पाहिजे. त्यासाठीचे नियम आणखी कठोर […]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी येत्या 03 मे पर्यंत मशिदींवरचे भोंगे (Loud Sperakers) हटवण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल, अशा इशाराही दिला आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीदेखील राज ठाकरेंच्या या भूमिकेला पाठींबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांसाठी समान लागू झाला पाहिजे. त्यासाठीचे नियम आणखी कठोर केले तरी चालतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच ठराविक धर्मियांचे लांगूलचालन करत सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाळला जात नसेल तर त्या ठिकाणी कायदा हातात घेण्याचे स्टेटमेंट्स येतात. यावर मुख्यमंत्र्यांनी वेळीच निर्णय घ्यावा, असा इशारादेखील दरेकर यांनी दिला आहे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

