VIDEO : Nawab Malik हे हिंदूद्वेष्टे आहेत, दुटप्पी भूमिका जनतेला दिसतात-Pravin Darekar

मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा वाद काही थांबताना दिसत नाही. या वादावरून आता राजकीय नेत्यांमध्येच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टिपू सुलतानहे स्वातंत्र्य सेनानी होते. महान व्यक्तिमत्त्व होते, असा दावा केला आहे. तर मलिक हे मुस्लिम समाजाचेच आहेत. ते हिंदुद्वेष्ट्ये आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 27, 2022 | 1:36 PM

मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा वाद काही थांबताना दिसत नाही. या वादावरून आता राजकीय नेत्यांमध्येच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टिपू सुलतानहे स्वातंत्र्य सेनानी होते. महान व्यक्तिमत्त्व होते, असा दावा केला आहे. तर मलिक हे मुस्लिम समाजाचेच आहेत. ते हिंदुद्वेष्ट्ये आहेत. त्यामुळे मलिक यांच्याकडून वेगळी अपेक्षाच नाही, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांच्यावर थेट वार केला आहे. या आधी भाजपचे नेते राज पुरोहित यांनी थेट या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणावरून राज्यात दंगली पेटतील असा इशाराही पुरोहित यांनी दिला होता.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें