AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pravin Darekar यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

Pravin Darekar यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 4:30 PM
Share

 रेकॉर्डवरील पुरावे प्रथमदर्शनी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा गुन्ह्यात आरोपी आणि लाभार्थी म्हणून सहभाग दर्शवते, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले.

रेकॉर्डवरील पुरावे प्रथमदर्शनी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा गुन्ह्यात आरोपी आणि लाभार्थी म्हणून सहभाग दर्शवते, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) दरेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना नोंदवले. प्रवीण दरेकर ज्या मजूर सोसायटीचे सभासद असल्याचा दावा करत होते, ती त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावरुन कार्यरत नसल्याचीही दखल न्यायालयाने घेतली. प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यास तपासाला मोठा फटका बसेल आणि कटाचा उलगडा होण्याच्या शक्यतेत अडथळा निर्माण होईल. परिणामी सार्वजनिक हितालाही धक्का बसेल, असं निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नोंदवल्याचं शनिवारी उपलब्ध झालेल्या सविस्तर आदेशात समजतं.