Navneet Rana | ‘अल्लाह ‘कडे दुवा करतो, तुम्हाला काही होऊ नये, नवनीत राणा यांना निनावी पत्र, एकच खळबळ

Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांना एक निनावी पत्र आले असून त्यांना सतर्क राहण्याचा इशार देण्यात आला आहे.

Navneet Rana | 'अल्लाह 'कडे दुवा करतो, तुम्हाला काही होऊ नये, नवनीत राणा यांना निनावी पत्र, एकच खळबळ
| Updated on: Jul 29, 2022 | 3:25 PM

Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rane) यांना एक निनावी पत्र (Anonymous Letter)आले असून त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली असून हे पत्र पाठवण्या मागचा उद्देश काय असेल, हे पत्र कोणाकडे संकेत करत आहे, या पत्राचा अर्थ काय अशा उलटसूलट चर्चांना सध्या उधाण आले आहे. अज्ञात व्यक्तीने हे पत्र लिहिले आहे. त्यात राणा यांना सतर्क (Alert) राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. एवढंच नाही तर अल्लाह कडे राणा यांना काहीच होऊ नये, अशी दुवा मागत असल्याचे पत्रात म्हटले आहे. याचा अर्थ राणा यांना कोणापासून, कसला तरी धोका असल्याचे पत्र सूचवत आहे.

राजस्थान (Rajasthan) सीमेवरुन काही लोक अमरावतीत येत आहेत, तेव्हा सतर्क रहा, असा धमकीवजा इशारा पत्रात देण्यात आला आहे. या पत्राच्या अनुषंगाने आता पुढील कारवाई करण्यात येत आहेत. नवनीत राणा यांच्या अमरावतीच्या घरी हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. नवीनत राणा धमकी देणारा आणि पत्र पाठविणारी ही व्यक्ती कोण याच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केल्याने धमक्या येत असल्याचे राणा यांनी सांगितले.

Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.