जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस अपघात, 16 प्रवाशांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरू
VIDEO | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळल्याने 7 ते 8 जणांचा मृत्यू, नेमकी कुठे घडली घटना?
खोपोली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एक खासगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. ही बस दरीत कोसळल्याने 7 ते 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ पहाटे 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. यातील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांना यश आलं असून अद्याप काही लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या मागील घाटात बसचा तोल गेला आणि ही बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्याने अचानक बस आदळली आणि बसमधील प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

