AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’, प्रदूषणाचे प्रमाण 111 प्रतिघनमीटर

| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 11:28 AM
Share

आयआयटीएम-सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यातील हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 193 प्रतिघनमीटर इतके होते, तर पीएम2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 111 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आलं

सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ स्तरावर असल्याची नोंद झालीय. आयआयटीएम-सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीनुसार, पुण्यातील हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 193 प्रतिघनमीटर इतके होते, तर पीएम2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 111 प्रतिघनमीटर इतके नोंदविण्यात आलं. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मानकानुसार हे प्रमाण अनुक्रमे 100 आणि 80 प्रतिघनमीटर असणे अपेक्षित आहे. यामध्ये भूमकर चौक आणि लोहगाव येथे हवेची गुणवत्ता ‘सर्वाधिक वाईट’ स्तरावर आहे. तर, पाषाण शिवाजीनगर, कात्रज आणि भोसरी या भागांमध्येही हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. वाढत्या पीएम प्रदूषकामुळे पुण्यातील हवेची गुणवत्ता सर्वाधिक प्रदूषित शहर मानल्या जाणाऱ्या दिल्ली येथील हवेच्या गुणवत्तेपेक्षाही अधिक वाईट स्तरावर पोहोचली आहे.