Pune Baramati Car Accident | भरधाव कारची दुचाकीला धडक, धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

पुणे जिल्ह्यात दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघाती मृत्यू (Couple Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारामती-जेजुरी रस्त्यावर भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Pune Accident) पती-पत्नीचा मृत्यू झाला. पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब कोलते आणि सविता कोलते यांना या अपघातात प्राण गमवावे लागले.

महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 16, 2022 | 9:42 AM

पुणे जिल्ह्यात दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघाती मृत्यू (Couple Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बारामती-जेजुरी रस्त्यावर भरधाव वेगातील कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Pune Accident) पती-पत्नीचा मृत्यू झाला. पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब कोलते आणि सविता कोलते यांना या अपघातात प्राण गमवावे लागले. या अपघातानंतर (Baramati Bike Accident) पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन सोडून दिल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मोरगाव पोलिस दूरक्षेत्राबाहेर मृतदेहासह तब्बल चार तास ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें