गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, भाविकांची गर्दी

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 8:31 AM

आज गणेश जयंती आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक आरास करण्यात आली आहे. शिवाय गणेशभक्तांनीही दर्शनासाठी गर्दी केली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळच्या वतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने आज पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत पद्मश्री उस्मान खान यांनी सतारवादनातून श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केला.  त्यापूर्वी पहाटे 3 वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक देखील झाला.  मंदिरावर तिरंगी फुलांची आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली आहे . मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI