Rupali Chakankar : संतापजनक… कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्…
दौंडच्या बोरावकेनगर भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दौंड भागात एका काचऱ्याच्या ढिगाऱ्यात ही 6 ते 7 अर्भक वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये आढळून आली असून त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पुण्यातील दौंडमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. दौंड येथील एका भागात काचऱ्याच्या ढिगाऱ्यात 6 ते 7 अर्भक वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये सापडली आहे. तसंच काही अर्भकांच्या शरीराचे अवशेष देखील यात आढळून आले आहे. दौंडच्या बोरावकेनगर भागात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तर ही अर्भक कुठून आली? या संदर्भात आता पोलिसांकडून तपास सुरू असताना राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाचं ट्विट काय?
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यात बोरावकेनगर मध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भक व मानवी अवशेष सापडल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. सद्यस्थितीत दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डॉक्टरांच्या पथकामार्फत तपासणी केली आहे. पोलिसांनी याचा तपास व रुग्णालयाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाकडून देण्यात आली आहे. तर हे मानवी अवशेष रुग्णालयाकडे अभ्यासासाठी २०२० पासून आहेत आणि नजरचुकीने कचऱ्यात गेले अशी प्राथमिक माहिती आहे. राज्य महिला आयोग तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना देत वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचेही राज्य महिला आयोगाकडून सांगण्यात आले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

