Sanjay Raut : संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, ‘हारामXXX अन्…’
'त्याचा माज आमचे शिवसैनिक उतरवल्याशिवाय राहणार नाही.’, असा इशाराच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय. यासह सत्ताधारी नेत्यांनी काय म्हटलंय बघा?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला चौकशीसाठी आजच हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे. खार पोलिसांकडून कुणाल कामरा याला हे समन्स पाठवण्यात आलं आहे. तर कामरा हा सध्या मुंबईत नसल्याने खार पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती आहे. या घडामोडीदरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कुणाल कामरा आणि माझा डीएमए सारखाच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलंय तर कुणाल कामरा चुकला असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करा, असेही राऊत म्हणाले. तर या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्यावर राजकीय वर्तुळातील काही नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय. यावेळी सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर शिवीगाळ केली असून परिणय फुके आणि संजय गायकवाड यांच्याक़डून पातळी सोडून शिवीगाळ करण्यात आली आल्याचे पाहायला मिळाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

