Sanjay Gaikwad : संजय राऊत अन् कुणाल कामरा एकाच बापाचे…, शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं तयार केल्यानंतर शिंदेंची शिवसेना चांगलीच खवळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शिवसेनेतील आमदारांकडू अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया येताना दिसताय.
‘मी माफी मागणार नाही, असं म्हणत कुणाल कामराने जी मुजोरी दाखवली, त्यावरून असं दिसतंय त्याला चांगलाच माज आहे. ही मस्ती कोणाच्या भरोसे आहे? कोण कामराच्या पाठिशी आहे? त्याचा माज आमचे शिवसैनिक उतरवल्याशिवाय राहणार नाही.’, असा इशाराच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय. पुढे ते असेही म्हणाले, त्याने जे काही केलंय हा मोठा गुन्हाच आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल. कामराला महाराष्ट्रात येऊ द्या, फिरूद्या त्याला महाराष्ट्रात मग त्याचा माज उतरवतो, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय. दरम्यान, संजय राऊत यांनी कामराचा आणि माझा DNA एक असल्याचे म्हटलंय. राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले, ‘संजय राऊत अन् कुणाल कामरा हे दोघे एका बापाचे औलाद असतील’, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यासह कामराला देखील फटकारल्याचे पाहायला मिळाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

