Eknath Shinde : ‘मी दुर्लक्ष केलं, विडंबन समजू शकतो पण…’, कुणाल कामराने उलडवलेल्या खिल्लीनंतर शिंदे स्पष्टच म्हणाले
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मी कोणाला घाबरत नाही माफी मागणार नाही असं त्याने म्हटलं तर आता एकनाथ शिंदेंनी देखील यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे’, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी कुणाल कामराच्या गाण्यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे. पुढे एकनाथ शिंदे असेही म्हणाले, ‘माझ्यावर केलेल्या आरोपांवर मी दुर्लक्ष केलं’. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एका संकेतस्थळाला कुणाल कामराबाबत ही प्रतिक्रिया दिली. कुणाल कामराने केलेल्या गाण्याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो पण हे व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केले मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबाबत काय म्हटलंय बघा…’, असं म्हणत हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. हे कोणाची सुपारी घेऊन केलेले आरोप आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

