Kunal Kamra : कुणाल कामराची माफी नाहीच… शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर पहिलं ट्वीट काय?
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं गाणं गायलं आहे. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना चांगलीच खवळली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्याचा निषेध म्हणून कुणाल कामराच्या स्टुडिओची मोठी तोडफोड केली.
‘मी माफी मागणार नाही. मी कोणाला घाबरत नाही. मी कुठेही लपून बसलो नाही.’, असं म्हणत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराकडून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पुढे तो असंही म्हणाला की, माझ्या शोसाठी द हॅबिटॅट स्टुडिओ जबाबदार नाही. तर पोलीस आणि तपास यंत्रणांशी सहकार्याने वागण्यास तयार असल्याचेही कुणाल कामरा याने म्हटलंय. यासंदर्भात कुणाल कामराने एक सोशल मीडिया पोस्ट केली आणि त्याद्वारे त्याने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘माझा नंबर लिक करून काही लोक मला सतत फोन करत आहेत. ते सर्व अनोळखी फोन माझ्या व्हॉईस मेलवर जातात. तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळेल ज्याचा तुम्हाला तिरस्कार आहे. मी जे बोललो तेच आधी अजित पवार एकनाथ शिंदेंना बोलले. मी माफी मागणार नाही मला या जमावाची भीती नाही. कोणत्याही कायदेशीर कारवाईला समोरं जावून पोलिसांना सहकार्य करेन’, असं कुणाल कामराने ट्वीटमध्ये म्हटलंय. बघा नेमकं काय आहे ट्वीट?
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

