Pune : दौंडच्या यवतमध्ये हिंसाचार.. असं काय घडलं की जमावाकडून थेट जाळपोळ अन् दगडफेक, राड्यामागे नेमके कोण?
आक्षेपार्ह व्हाट्सअॅप पोस्टमुळे दोन गट आमनेसामने आले आणि हिंसाचार झाला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणामध्ये दोघांना ताब्यात घेतलेला आहे.
पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला आणि प्रकरण दगडफेक आणि जाळपोळीपर्यंत पोहोचलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान आणि एका तरुणाने व्हाट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्टमुळे वाद झाला आणि त्यातून हिंसाचार झाला. दुकान, बेकरीतील जाळपोळ, लोकांचा नुकसान एका गटाकडून मशिदीवर दगडफेक झाली. त्यानंतर जमावाने गाड्या पेटवल्या. हिंसाचारवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा माराही केला. यावेळी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या घरावर सुद्धा जमावाने दगडफेक केली.
26 जुलै रोजी एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणाने मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केल्याचा आरोप होतोय. तर तरुणाचा मोबाईल आणि चप्पलही घटनास्थळीच मिळाले, असा दावा केला जातोय. 30 जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीला त्याच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या उसांच्या शेतातून अटक केली. याच घटनेच्या विरोधात एक दिवस आधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांनी आक्रमक भूमिका घेत यवतमध्ये सभाही घेतली. या हिंदू जन आक्रोश मोर्चात पडळकर, संग्राम जगतापांसह हेमांगी सखीही उपस्थित होत्या. या सभेनंतर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप होतोय आणि त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ केली.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी

