AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indrayani River Bridge : 5 मिनिटं पूल हलत होता अन् लोकंही सावध झालेली पण... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार

Indrayani River Bridge : 5 मिनिटं पूल हलत होता अन् लोकंही सावध झालेली पण… बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार

Updated on: Jun 16, 2025 | 8:24 AM
Share

कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील पुलावर पर्यटकांनी दुचाकी नेल्यानं ओव्हारवेट होऊन पूल कोसळला असल्याचे सांगितले जात असताना या माहितीला दुजोरा मिळणारी आणखी एक मोठी माहिती प्रत्यक्षदर्शी पर्यटकांकडून मिळतेय

पुण्यातील मावळमधील कुंडमळा या ठिकाणचा इंद्रायनी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. याचं रेस्क्यू ऑपरेशन काल रविवारी रात्री 10 वाजता थांबविण्यात आलं, ते आज सकाळी 7 वाजता पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. पण मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने याचा व्यत्यय आजच्या बचावकार्यात होताना दिसत आहे. काल दुपार साडेतीन वाजेपासून रात्री दहावाजेपर्यंत म्हणजे साडेसहा तास बचावकार्य सुरु होतं. यादरम्यान 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं, तसेच 51 पर्यटक यातून बचावल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र तरी ही खबरदारी म्हणून आज पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाणार आहे. अशातच एका प्रत्यक्षदर्शीकडून पर्यटकांकडून मोठी समोर येत आहे. पाच मिनिटं पूल हलत होता आणि त्यामुळे लोकं सावध झाले होते. मात्र पुलावर दुचाकी गाड्या बऱ्याच असल्याने लोकांना कुठेच जाता येत नव्हतं, असं देवगाववरून आलेल्या दीपक वळवीकर यांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली.

Published on: Jun 16, 2025 08:24 AM