VIDEO : Vaishnavi Patil Mafi | गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवी पाटीलने शिवप्रेमींची मागितली जाहीर माफी

पुण्यातील लाल महालमध्ये लावणी नृत्याचा व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी राज्यभरात त्यावर निषेध व्यक्त होतोय. ऐतिहासिक लाल महालात डान्स करणाऱ्या डान्सर वैष्णवी पाटीलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवीने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला होता.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 21, 2022 | 1:22 PM

पुण्यातील लाल महालमध्ये लावणी नृत्याचा व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी राज्यभरात त्यावर निषेध व्यक्त होतोय. ऐतिहासिक लाल महालात डान्स करणाऱ्या डान्सर वैष्णवी पाटीलसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वैष्णवीने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातील ‘चंद्रा’ या गाण्यावर लावणीचा व्हिडीओ लाल महालात शूट केला होता. हा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट करताच त्यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. वैष्णवीच्या या कृत्यावर सोशल मीडियावरून टीका झाली. तर संभाजी ब्रिगेडसग पुरोगामी संघटनांनी या घटनेविषयी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता याप्रकरणी वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. “अनवधानाने माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा”, असं ती या व्हिडीओत म्हणाली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें