पुणेकरांसाठी मोठी बातमी, ‘या’ मुख्य रस्त्याच्या वाहतुकीत बदल तर ‘हे’ रस्ते बंद, काय आहे कारण?
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. पुणे शहरातील मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तर पुण्यातील काही महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद देखील करण्यात आले आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पुणे, ५ नोव्हेंबर २०२३ | पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. पुणे शहरातील मुख्य रस्त्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तर पुण्यातील काही महत्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद देखील करण्यात आले आहे. अवघ्या काहीच दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपल्याने बाजारपेठ सजल्या असून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दिवाळी सण म्हटला की फराळ, नवीन कपडे, रांगोळी, आकाश कंदील, पणत्या, लायटींग याची खरेदी आवर्जून प्राधान्याने केली जाते. दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याने आता पुण्यात नागरिकांची एकच गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीसह अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लक्ष्मीरोड कडे जाणारा बाजीराव रस्ता बंद तर टिळक रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. यासह लक्ष्मी रोड, टिळक रोड, तुळशीबाग या रस्त्यावर दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने पुणे पोलिसांकडून हे रस्ते बंद करण्यात आले.