‘भारतात बॉम्बस्फोट करणार!’, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात धमकीचा मेल अन्…
VIDEO | 'भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणणार', पुण्यातील व्यक्तीला असा मेल आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल
पुणे, ९ ऑगस्ट २०२३ | काहीच दिवसांवर भारताचा स्वातंत्र्यदिन आहे. अशातच स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात दहशतवादी हल्ल्यांचं सावट असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर धमकीचा फोन आल्यानंतर आता पुण्यातील एका व्यक्तीला भारतभर स्फोट घडवण्याची धमकी मेल द्वारे देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये एका व्यक्तीला मेल आला. यामध्ये भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेल आल्यानंतर ज्या व्यक्तीला हा मेलद्वारे मेसेज मिळाला त्याने पुणे शहर पोलिस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन तक्रार दाखल केली आणि पुणे पोलिस याप्रकरणाचा पुढे तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

