Pune Special Report | राज्यात एकत्र, पुणे महापालिका निवडणूक मात्र स्वबळावर?

2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तस तिसऱ्या लाटेची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशास्थितीत पुण्यात मात्र महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताना पाहायला मिळतेय. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून जागाचं गणित मांडण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेवर स्वबळावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केलाय, तर भाजपनं खासदार गिरीश बापटांवर जबाबदारी सोपवल्याचं पाहायला मिळतंय.