VIDEO | 7 हजार किलोच्या पुणेरी मिसळची सर्वत्र चर्चा, गिनीज बुकमध्येही नोंद

विशेष म्हणजे 3 तासात 300 एनजीओमार्फत 30 हजार गरजू लोकांना ही मिसळ वाटप करण्यात आली. (Puneri Misal Records in Guinness Book)

Namrata Patil

|

Mar 15, 2021 | 8:19 AM

पुणे : मिसळ म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पुणे आणि नाशिक अशी दोन शहरं आपल्या डोळ्यासमोर हमखास उभी राहतात. पुण्यातील पुणेरी मिसळी ही सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. मात्र पुण्यात नुकतंच एक मिसळीचा विक्रम बनवण्यात आला आहे. त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. (Pune Suryadatta Institutes make 7ooo kg Puneri Misal Records in Guinness Book)

पुण्यातील सूर्यदत्त इन्स्टिट्यूटनं-विष्णू महामिसळ 2021 या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी 7 तासात तब्बल 7 हजार किलो मिसळ बनवण्यात आली. ही मिसळ तयार करण्यासाठी 30 जणांचा सहभाग होता. विशेष म्हणजे 3 तासात 300 एनजीओमार्फत 30 हजार गरजू लोकांना ही मिसळ वाटप करण्यात आली.

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने ही मिसळ बनवली आहे. या मिसळचा एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलीय आहे. तसेच युनिक बेंचमार्किंग वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या विक्रमाची नोंदणी करण्यात आली आहे.

दरम्यान आतापर्यंत सूर्यदत्त इन्स्टिट्यूटच्या नावावर तब्बल 32 रेकॉर्ड नोंद करण्यात आले आहेत. ही मिसळ मध्यरात्री 2 च्या सुमारास बनवायला सुरुवात करण्यात आली. ती सकाळी 8 वाजता बनवून तयार झाली. त्यामुळे या 7 हजार किलोच्या अनोख्या पुणेरी मिसळची सगळीकडे चर्चा रंगली आहे.  (Pune Suryadatta Institutes make 7ooo kg Puneri Misal Records in Guinness Book)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें