Puneri Misal : ‘पुणे तिथं काय उणे’, कोविड काळात 7 तासात तब्बल 7000 किलो मिसळ, 30 हजार गरजूंना वाटप

मिसळ म्हटली की पुणे आणि नाशिकची मिसळ हमखास आठवते. पुणेरी मिसळ चांगलीच प्रसिद्ध आहे. आता याच पुण्यात मिसळीचा एक विक्रम करण्यात आलाय.

Puneri Misal : 'पुणे तिथं काय उणे', कोविड काळात 7 तासात तब्बल 7000 किलो मिसळ, 30 हजार गरजूंना वाटप
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 1:38 AM

पुणे : मिसळ म्हटली की पुणे आणि नाशिकची मिसळ हमखास आठवते. पुणेरी मिसळ चांगलीच प्रसिद्ध आहे. आता याच पुण्यात मिसळीचा एक विक्रम करण्यात आलाय. पुण्यातील सुर्यदत्त इन्स्टिट्यूटनं ‘विष्णू महामिसळ 2021’ या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांनी युनिक बेंच मार्किंग वर्ल्ड रेकॉर्ड आज नोंदवला. यात त्यांनी 7 तासात 7000 किलो मिसळ बनवली. 30 लोकांनी ही मिसळ शिजवली. 3 तासांमध्ये 300 एनजीओंमार्फत 30 हजार गरजू लोकांना ही मिसळ वाटली (World record of Puneri Misal of 7 thousand Kilogram in Pune).

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने ही मिसळ बनवली. या मिसळीचा एक नवा विक्रम नोंदवण्यात आलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आलीये. तब्बल 32 रेकॉर्ड आज सुर्यदत्त इन्स्टिट्यूटनं आपल्या नावावर केलेत. मध्यरात्री 2 वाजता मिसळ बनवायला सुरुवात झाली आणि सकाळी 8 वाजता ती बनवून तयार झाली. यानंतर 7 हजार किलोच्या मिसळची सगळीकडेच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

या विषयी बोलताना मास्टर शेफ विष्णू मनोहर म्हणाले, “हा खूप चांगला अनुभव होता. ही सर्व मिसळ आम्ही चुलीवर तयार केली. याला सर्व कॉलेजच्या तरुणांचा उत्तम प्रतिसाद होता. आधीचे वर्ल्ड रेकॉर्ड हजारो लोक आजूबाजूला असताना झालेत. मात्र, हा रेकॉर्ड वेगळा आहे. कोविड असल्याने आजूबाजूला केवळ 20-25 लोक होती. तेवढ्याच लोकांच्या समोर ही मिसळ तयार करण्यात आली.”

7 हजार किलो मिसळीत काय काय घातलं?

या विक्रमी 7 हजार किलो मिसळमध्ये 1200 मोड आलेली मटकी, 500 किलो कांद्याची पेस्ट, प्रत्येकी 150 किलो आले आणि लसणाची पेस्ट, 50 किलो हळद, 50 किलो तिखट, 100 किलो खोबरं, 200 किलो मसाला याचा उपयोग करण्यात आला. याशिवाय तब्बल साडेचार हजार लिटर पाणीही या मिसळमध्ये वापरण्यात आलं. ही मिसळ 10 फूट बाय 10 फूटची एकच कढई होती. या कढईची उंची 5 फूट आणि वजन 1000 किलो. दुसरी कढई 7 फूटाची आहे. अशाप्रकारे दोन कढाईंचा उपयोग करुन आम्ही हा रेकॉर्ड बनवला.

हेही वाचा :

पुण्यातील बुलेट थाळीनंतर आता ‘तंदुरी निखारा तडका मिसळ’, महाराष्ट्रात कुठे मिळते ही खास मिसळ?

Skin Benefits | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी सेवन करा ‘केळ्याची स्मूदी’, अशाप्रकारे करा तयार…

Healthy Eating |  काम करत जागण्यामुळे रात्री भूक लागतेय? मग, नक्की खा ‘हे’ लेट नाईट स्नॅक्स

व्हिडीओ पाहा :

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.