Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून अनलॉक, सर्व दुकाने-मॉल उघडणार

पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात प्रामुख्याने अभ्यासिका, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुपारीच याबाबत संकेत दिले होते. त्यानुसार आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात प्रामुख्याने अभ्यासिका, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहे.