Vaishnavi Hagawane : तीच माझी मोठी चूक… पुण्यातील वैष्णवी हगवणेची मैत्रिणीसोबतचा ऑडिओ व्हायरल, कथित क्लिप व्हायरल
16 मे 2025 रोजी तिने तिच्या आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पती, सासू-सासरे तसेच नंदेकडून तिचा जाच केला जायचा, असा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी एक नवी अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणेची तिच्या मैत्रिणीसोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. लग्न करून मोठी चूक केल्याचे वैष्णीने मैत्रिणीला सांगितल्याचे समोर आले आहे. असं वक्तव्य वैष्णवीने या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लिपची टीव्ही 9 मराठी पुष्टी करत नाही. “मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते. काय केलं काय नाही ते सगळं सांगते. मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते. शशांकसोबतही तू कधी प्रामाणिक नव्हती, असं मला ताई म्हणाली. तू फालतू तू घणेरडी आहे, असं म्हणत होती.”, असं या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. मला खूप आश्चर्य वाटत आहे. माझा नवराच माझा कधी झाला नाही. सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली…पुढे या क्लिपमध्ये असंही ऐकायला मिळतंय.