आषाढी एकादशीनिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीवर वारकरी नाराज
आषाढी वारीला मोजक्या 100 वारकऱ्यांच्या उपस्थित मध्ये आणि लालपरीमध्ये हा सोहळा पार पाडण्याची भूमिका शासनाकडून घेण्यात आली आहे. त्या निर्णयावर देहू मधील संत तुकाराम महाराज संस्थांच्या विश्वस्त यांच्या कडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे: येणाऱ्या आषाढी वारीला मोजक्या 100 वारकऱ्यांच्या उपस्थित मध्ये आणि लालपरीमध्ये हा सोहळा पार पाडण्याची भूमिका शासनाकडून घेण्यात आली आहे. त्या निर्णयावर देहू मधील संत तुकाराम महाराज संस्थांच्या विश्वस्त यांच्या कडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मानाच्या 10 पालख्यानी शासनाला आम्ही पर्याय दिले होते. मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे वारकरी सांप्रदाय नाराज झाला आहे, देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
पायी वारी होणार नाही याची खंत आहे.मात्र लोकहित महत्वाचे आहे. पालखी होणार नसली तरी वारकरी संख्या वाढवण्याचा निर्णयावर समाधानी आहोत. कोरोनाचे संकट लक्षात घेता शासनाला सहकार्य करण्याची भूमिका असल्याचं
संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्रिगुण गोपाळ गोसावी यांनी म्हटलं आहे.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

