पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15…असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली, नवऱ्याच्या अमानवीय कृत्यानं पुणे हादरलं
पुण्यात पुन्हा एकदा एक गंभीर गुन्हा समोर आला आहे. पती पत्नीच्या प्रेमळ नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात एका विवाहित महिलेसोबत अमानवीय प्रकार घडला.
पुण्यात पुन्हा एकदा एक गंभीर गुन्हा समोर आला आहे. पती पत्नीच्या प्रेमळ नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली. पुण्यातील उरुळी कांचन परिसरात एका विवाहित महिलेसोबत अमानवीय प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय महिलेला तिच्या पतीने संशयातून आणि मुलगा होत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. आरोपी पती दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीवर अनैतिक संबंधांचे आरोप करत तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्याने तिच्या गुप्तांगावर अॅसिड ओतल्याचा गंभीर आरोप आहे. महिलेच्या आरडाओरडानंतरही आरोपीने तिला रुग्णालयात न नेता तब्बल १५ दिवस घरातच ठेवले. अखेर संधी साधून पीडित महिला आपल्या दोन मुलींना घेऊन माहेरी पोहोचली आणि संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी तातडीने महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून आरोपी पतीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Published on: May 18, 2026 12:37 PM
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही

