Jalgaon Pushpak Train Accident Video : एक अफवा अन् 11 जणांचा मृत्यू, ‘पुष्पक’मधून प्रवाशांच्या उड्या आणि दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ट्रेननं चिरडलं
जळगावच्या परधाळे गावाजवळ एक मोठी दुर्घटना घडली. एक्स्प्रेसची चैन ओढल्यामुळे पुष्पक एक्सप्रेसचे ब्रेक लागले आणि ठिणग्या उडाल्या त्यानंतर आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने ११ प्रवाशांना चिरडल्याची माहिती मिळतेय.
जळगावच्या परधाळे गावाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना घडली. ज्यात काही प्रवाशांचा मृत्यू झाला. दुपारी साडे तीन ते पावणे चार वाजेदरम्यान लखनऊवरून पुष्पक एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. जळगावच्या पाचोऱ्या तालुक्यातील परधाळे या गावाजवळ प्रवाशाकडून चैन ओढण्यात आली. त्यामुळे ब्रेक लागला आणि ठिणग्या उडाल्या त्यानंतर आग लागल्याच्या अफवेने प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने ११ प्रवाशांना चिरडलं ज्यात प्रवाशांचा मृत्यू झाला. पुष्पक एक्स्प्रेस प्रवाशांनी उड्या मारण्याचा आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसचा टाईमिंग एकच झाला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. इतकी भीषण घटना घडली की यामध्ये काही जण गंभीर जखमी झालेत तर काहींचा जागीच मृत्यू झाला. आगीच्या अफवेमुळे ३० ते ३५ प्रवाशांनी उड्या मारल्याची माहिती आहे. दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एक्स्प्रेसने चिरडणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. अपघाताची माहिती मिळताच सरकारी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना पाचोरा येथे रूग्णालयात दाखल कऱण्यात आलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...

कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय

तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
