“तुम्ही मणिपूरमध्ये माझ्या भारत मातेची हत्या केली, तुम्ही देशद्रोही आहात”, राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारला आज धारेवर धरलं. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारला आज धारेवर धरलं. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, “मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली आहे. भारत एक आवाज आहे. भारत आपल्या जनतेची आवाज आहे. हृदयातून येणारी आवाज आहे. त्या आवाजाची हत्या मणिपूरमध्ये करण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही भारत मातेची हत्या मणिपूरमध्ये केली आहे. तुम्ही मणिपूरमध्ये लोकांना मारून भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी नाही. त्यामुळेच तुम्ही मणिपूरला जात नाही. कारण हिंदुस्थानची हत्या केली आहे. भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे संरक्षक नाहीत. तुम्ही तर भारत मातेचे हत्यारे आहात.”त्यावेळी सभागृहात एकच गोंधळ झाला.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

