माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय होणार? विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर सूचक बोलले…
नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. कारण कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यावर विधीमंडळ पुढचा निर्णय घेणार आहे आणि त्याआधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सूचक विधान केले आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरून घटनेनुसार योग्य निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता आमदारकी रद्द करायची की नाही हा निर्णय नार्वेकरांना घ्यायचा आहे. कोकाटेबाबत कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई करू अशी विधीमंडळाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अजून शिक्षेची प्रत विधीमंडळाला कशी मिळाली नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या कार्यालयात फोन करून एक प्रत विधीमंडळात पाठवण्याच्या सूचना दिल्या. तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सुनील केदार यांचा निर्णय झाला त्यानुसार कायद्यानुसार कोकाटेंवरही निर्णय घेणार असे विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले. कागदपत्रांची हेराफेरी करून भाड्याची घरं लाटल्या प्रकरणी कोकाटे यांना कोर्टाने दोषी ठरवलं दोन वर्षांची शिक्षा ही सुनावली. मात्र जिल्हा न्यायालयाच्या विरोधात सत्र न्यायालयात जाण्याचा निर्णय कोकाटे यांनी घेतला. आता कोर्टाने शिक्षेस स्थगिती दिली तर आमदारकीवर परिणाम होणार नाही आणि कोर्टाने शिक्षेच्या स्थगितीस नकार दिला तर मग आमदारकी जाणार. त्यावरूनच दोन दिवस वाट बघा असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

