AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणात ठाकरेंच्या दोन तोफ धडाडल्या; उद्धव अन् राज यांचा रिफायनरीला विरोध? राणे-भाजपची कोंडी होणार?

कोकणात ठाकरेंच्या दोन तोफ धडाडल्या; उद्धव अन् राज यांचा रिफायनरीला विरोध? राणे-भाजपची कोंडी होणार?

| Updated on: May 07, 2023 | 9:28 AM
Share

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे राणे-भाजपची कोंडी होणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

मुंबई : रायगडमधील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) कोकणासह राज्याचं राजकारण चांगलचं तापलं आहे. कोकणात काल दोन माजी मुख्यमंत्री एकमेकांना भिडले तर भाजपसह शिंदे गटाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. यादरम्यान रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली आणि त्यांनी देखील या मुद्द्याला हात घातला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रिफायनरीला थेट विरोध न करता कोकणी माणसाला भावनिक साद घातली. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांची सहमती नसेल, तर प्रकल्प होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी महाडमधील सभेतमधून उद्धव ठाकरे यांनी दिला. तर राज यांनी कोकणी माणसाला साद घालत रिफायनरी गोव्यात का होत नाहीत? कातळशिल्पांच्या आसपास 3 किमीपर्यंत कोणताही विकास प्रकल्प करता येणार नाही. त्यामुळे माझी कोकणातील बांधवाना विनंती आहे की तुम्ही जमीन विकू नका. इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेऊन ते गब्बर होत आहेत. आणि कोकणी माणूस तसाच राहिला असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे राणे-भाजपची कोंडी होणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: May 07, 2023 09:27 AM