AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर 250-300 तरुणांवर आली उपासमारीची वेळ; गावकरी चितेंत

नितीन देसाई यांच्या निधनानंतर 250-300 तरुणांवर आली उपासमारीची वेळ; गावकरी चितेंत

| Updated on: Aug 04, 2023 | 9:47 AM
Share

नितीन देसाई यांनी एनडी-स्टुडिओ उभारल्यानंतंर परिसारातील गावातील दिडशेहून अधिक तुरुणांना रोजगार मिळाला होता. त्यांच्या निधानाने या तुरुणांचा रोजगार हरपला असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. देसाई यांच्या जाण्याने एनडी स्टुडिओत काम करणाऱ्या कामगारांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एनडी स्टुडिओमध्ये काम करणारे अनेक तरुण आसपासपासच्या गावातीलच होते. परंतु स्टुडिओला लागून असलेल्या हातानोली गावातील 80 टक्के लोक या स्टुडिओवर अवलंबून आहेत. आजूबाजूला पाच-सहा वाड्या असून या वाड्यांमधील 200-300 लोक या ठिकाणी काम करतात. हातोनोलीसह कातकरी वाडी, मोरबे गाव, वावरले, आसरा, जांभिवली इत्यादी भागातील तरुण एनडी स्टुडिओमध्ये काम करत आहेत. नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे आता या स्टुडिओचे पुढे काय होणार? असाच प्रश्न या तरुणांना पडला आहे.

Published on: Aug 04, 2023 09:47 AM